Join Us
Events 
TLC CSR Drive through Shri Siddhagiri Mat of giving Covid19 Immunity Boosters & Basic medicines

Kolhapur  May 01,2021

  

Started from 1st May 2021 & will continue to address all talukas in Kolhapur District
Description : आपल्या TLC social activity च्या माध्यमातून Covid साठी काय मदत करता येईल या साठी आम्ही पाच जण बुधवारी सिद्धगिरी मठ मध्ये स्वामीजींना भेटलो. त्यांनी सुचवल्या प्रमाणे छोट्या गावामध्ये जाऊन तेथील लोकांची आरोग्याची तपासणी करून त्यांना मोफत औषधे द्यावेत असे ठरले आहे. TLC मार्फत आपण लागणाऱ्या औषधाचा खर्च घेण्याचे ठरले आहे तसेच कॅम्प organise करण्यास मदत करणे आहे. 
सिद्धगिरी मठ मधून औषधांचे किट बनवण्यात येत आहे तसेच Immunity booster dose सुद्धा देण्यात येणार आहे.
वरील ठरल्या प्रमाणे काल trail प्रोजेक्ट शिये गावात करण्यात आला. 
खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 250 जणांना काल लोकांची आरोग्याची तपासणी मठातील डॉक्टर कडून करण्यात आली व औषध वाटप करण्यात आले आहे.
या अनुशंघाने आज तिथेच म्हणजे शिये गावात दुसरा camp आहे.
आपण सर्वाना विनंती आहे कि ज्यांना शक्य आहे त्यांनी camp ला भेटून मदत करावी.
अधिक माहिती साठी आपण खालील TLC मेंबर्स contact करा,

  • गोरख माळी 
  • संजय कारखानीस 
  • साई दास 
  • शिवाजी मोरे 
  • सुनील बत्तासे व 
  • जयकुमार परिख 

आपण आपल्या माहिती मधील छोटे गाव जेथे corona जास्त आहे ते सुचवा व आपण तिथे जाऊन मदत करू.
सोमवारी कुंभोज गावात आपण camp arrange केला आहे तेव्हा आपल्या सर्व तेथील ओळखीच्या लोकांना सांगून फायदा घेण्यास सांगा.
औषधाचे kit बनवण्यासाठी काही आपल्या लोकांची गरज आहे तेव्हा ज्यांना मदत करण्याची इच्छा असेल त्यांना गोरख माळी याना भेटावे.
तसेच आपण corona वरील mouth Spray Viro Shield चे विकत आणून सिद्धगिरी मठ मधील सर्व हॉस्पिटल स्टाफ ला देण्याचे ठरले आहे. त्यासाठी साईदास यांनी खूप मेहनत घेऊन त्याची मिळवण्याची जुळणी केली आहे व ते आपण TLC कडून भेट देणार आहोत.

माझी सर्वानी विनंती आहे कि आपण सर्वानी आपापल्या परीने या कार्यक्रमात भाग घेऊन व आर्थिक मदत करावी हि विनंती.

आपली आर्थिक मदत शिवाजी मोरे यांच्याकडे द्या.